तुझा राग योग्यच आहे आणि या लेखात तो चांगलाच व्यक्त झाला आहे.
हे वाचताना मला मला “प्रहार” सिनेमाची आठवण झाली. “अगर ये तुम्हारा बच्चा होता तो? वो देखो, तुम्हारा बच्चा सडकपर पैदा हुवा और पैदा होतेही मर गया” असं काहीतरी नाना रागाने म्हणतो, त्या प्रकाराने तुझाही राग व्यक्त झाला आहे.
अमिताभला सगळे ओळखतात, त्याच्यावर सगळे प्रेम करतात. तो जणू आपल्या कुटुंबाचाच भाग आहे असं सगळ्यांना वाटतं. (म्हणून तर आपण त्याला, नानाला, प्रेमाने अरे-तुरे म्हणतो.) याची जाणीव ठेऊन त्यानं आपली खाजगी गोष्ट आपल्याला सांगितली. स्वतःचा आनंद आपल्याबरोबर वाटला. या बातमीचं स्वागत आपणही चांगल्या प्रकारे करू, आपल्यालाही त्याच्याइतकाच आनंद होईल असं त्याला वाटलं असणार. तो स्वतः अत्यंत सुसंस्कृत असल्यानं याच सुसंस्कृतपणाची अपेक्षा त्यानं आपल्याकडून ठेवली असणार.
दुर्दैवानं आपण इतके सुसंस्कृत नाही, इतकेच नव्हे तर अशा गोष्टीवर सट्टा लावण्याइतके विकृत आहोत, हेच आपण दाखवून दिले. पाच हजार वर्षांच्या हिंदु संस्कृतीचा अभिमान सांगणारे आपण दुसर्याच्या आनंदात आनंद मानण्याइतकासुद्धा सुसंस्कृतपणा दाखवू शकत नाही.
सट्टा चालवणार्यांच्याबद्दल आपल्या काही अपेक्षा नाहीत व त्यांच्याबद्दल आपल्याला काही बोलायचेही नाही. पण लोक खेळत नसतील तर अशा गोष्टींवर कोण सट्टा चालवू शकेल?
अशा गोष्टींवर थोड्या पैशांसाठी सट्टा खेळणारे लाखो-करोडो विकृत लोक ज्या समाजात आहेत त्या समाजाबद्दल काय बोलायचे? आणि मुलगा-मुलगी बघून मुलींना गर्भावस्थेतच मारायचं या सार्वत्रिक महा-विकृत मानसिकतेपेक्षा व खुनी कृतीपेक्षा सट्टा खेळणं ही किरकोळ बाब आहे.
अशा समाजात, अशा काळात अमिताभला राहावे लागते व त्याच्या नातीला/नातवाला जन्म घ्यावा लागतो हे त्यांचं दुर्दैव.