माझी मतं माझी आहेत.
ती तुमच्या मताशी जुळती किंवा विरुद्धही असू शकतील.
माझी मतं तुम्हाला / इतरांना पटायलाच हवीत असा माझा आग्रह नाही. पण तुम्ही ती वाचून बघायला काय हरकत आहे? कदाचित ती तुम्हाला पटतीलही. कदाचित तुम्हाला त्यावर विचार करावासा वाटेल व तुम्ही तो करालही. नाही पटली तर सोडून द्या.
माझी मतं सारखी बदलू शकतात. नवीन अनुभवामुळं, वाचनामुळं, माझ्या विचारामुळं, तुम्ही सांगितल्यामुळंसुद्धा.
पण तुमचीही मतं मला पटतीलच व पटायलाच हवीत असंही नाही. पटली तर ती माझी होतील. नाही पटली तर मी सोडून देईन.
--- *** ---
4 Jun 2015
’मॅगी’सारख्या (सर्वच) प्रॉडक्ट्सवर संपूर्ण बंदी आणली पाहिजे.
जगभरात विषारी म्हणून बंदी असलेले पदार्थ आपल्या उत्पादनात वापरणार्या; जाहिरातीच्या माध्यमातून अशी उत्पादने भरमसाठ किमतीला आपल्या माथी मारणार्या; आरोग्यपूर्ण व आरोग्यवर्धक असल्याचा दावा करणार्या; अवाजवी विधाने करणार्या व संपूर्ण उत्पादन-माहीती पॅकेटवर न देणार्या सर्वच बड्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या उत्पादनांवर स्वेच्छेने संपूर्ण बंदीघालण्याची हीच वेळ आहे.
पण स्वतःला उच्च समजणार्या किंवा स्वतःला उच्च वर्गात गणले जावे असे वाटणार्या आपल्यालाच असले फालतू पदार्थ खाण्याचे व आपल्या मुलांना खाऊ घालण्याचे भिकेचे डोहाळे लागले आहेत त्याला कोण काय करणार? हा आपला निष्काळजीपणा आहे, का आपले अज्ञान आहे, का आपले आपल्या मुलांवरचे प्रेम कमी झाले आहे? का हा फक्त घरी स्वयंपाक करण्याचा आळशीपणा आहे?
संपूर्ण लेखासाठी पहा: - http://marathikhadyasanskruti.blogspot.in/
--- *** ---
10 Jul 2015
ब्रॅंडिंग हे धर्मासारखे आहे. ते तुम्हाला विश्वास व नंतर श्रद्धा ठेवायला भाग पाडते आणि नंतर त्या श्रद्धेचा गैरफायदा घेते.
मुळात धर्म किंवा ब्रॅंडिंग वाईट नाहीत. पण एकदा प्रस्थापित झाल्यावर गैरफायदा घेण्याची दोन्हीमागची वृत्ती एकच आहे.