श्री व सौ पाल
“चक् चक्”, सौ. पाल म्हणाली.
“बघ ना! माझ्या या म्हणण्यावरही तुझी प्रतिक्रिया फक्त ’चक् चक्’.”
“चक् चक्.”
“पुन्हा ’चक् चक्’!”
“... ...”
“माझं म्हणणं तुला आवडत नाही का?”
“... ...”
“माझं म्हणणं तुला पटत नाही का?”
“... ...”
“त्यावर तुला काही म्हणायचंच नाही का?”
“... ...”
“तुला काही मतंच नाही का?”
“... ...”
“तुला विचारच करता येत नाही का?”
“... ...”
“तू मतीमंद आहेस का?”
“... ...”
“तुला “चक् चक्” शिवाय काही बोलताच येत नाही का?”
“... ...”
“तुला मोबाईल घेऊन देऊ का?”
“... ...”
“छेः बुवा! मी काय भिंतीपुढे बोलतोय का?”
“भिंतीवरून बोलतोय्स.”
“काय?”
“तुला दुरुस्त केलं.”
“काय? ... चक् चक्! ... काही म्हणायचीसुद्धा सोय उरली नाही.”
“मग म्हणू नकोस. सगळं म्हणायला कशाला हवं.”
“चक्! ... तेही खरंय् म्हणा. म्हणून काही उपयोग असेल तर म्हणायचं.”
“चक् चक्.”
“मग काय तर! ... ... मला काही वेळा वाटतं, संवादासाठी, भावना व्यक्त करण्यासाठी आपला शब्द-संग्रह कमी पडतो.”
“चक् चक्. पण त्यामुळे आपली भांडणंही होत नाहीत.”
“चक् चक्. ... पण ती शब्द-संग्रह कमी पडल्यामुळे नाहीत. त्याचं कारण मी या भिंतीवर तर तू त्या भिंतीवर, मी या खोलीत तर तू त्या खोलीत, मी मंगळावर तर तू शुक्रावर. म्हणून!”
“चक् चक्.”
“तू आनंद व्यक्त करते आहेस का हळहळ?”
“चक् चक्. ... माणसाच्या संगतीत राहून राहून तू हे असले विचार करतोय्स. आपण कुठंही असलो तरी मनातलं कळायला–कळवायला शब्दांच्या कुबड्या तुला कधीपासून लागायला लागल्या? दोन शब्दांवरच तर आपला संसार झाला.”
“चक् चक्.”
“सुसंवादासाठी शब्दांची नाही तर कळवण्याची-कळून घेण्याची इच्छा लागते.”
“चक् चक्. ... नेहमीप्रमाणे तुझंच बरोबर.”
he he :) i can't belive mi he lihitiye pan palinchi asunhi mast gosh aahe :)
ReplyDelete